नुस्ली वाडियांचीही टाटा स्‍टीलमधून गच्छंती

nusli-wadia
नवी दिल्‍ली- ब्रिटानिया इंडस्‍ट्रीज आणि बॉम्बे डाइंगचे चेअरमन नुस्‍ली वाडिया यांना टाटा स्‍टीलच्या शेअर्सव्होल्डर्सनी जबरदस्त झटका दिला. स्वतंत्र संचालकपदावरून वाडिया यांची गच्छंती झाली आहे. कंपनीच्या सर्व साधारण सभेत (ईजीएम) हा निर्णय घेण्यात आला आहे.

तब्बल ९०.८० टक्के शेअरहोल्‍डर्सनी वाडिया यांना संचालकपदावरून हटवण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात‍ त्यांच्या विरोधात मतदान केले. दरम्यान, वाडिया हे या सभेत उपस्थित नव्हते. सायरस मिस्‍त्री यांचा पायउतार झाल्यानंतर वाडिया आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांच्या मतभेद निर्माण झाले होते.

दरम्यान, यापूर्वी सायरस मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून गच्छंती करण्‍यात झाली होती. टाटा समूहातील पाच कंपन्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत मिस्त्री यांना या कंपन्यांच्या संचालक पदावरून दूर करण्यासाठी शेअरहोल्डर्सचे एकमत झाले होते. मिस्त्री यांना काढण्यासाठीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याऐवजी आता त्यांनी दिलेला राजीनामा भागधारकांसमोर मांडला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. या सभेत नुसली वाडियांना स्वतंत्र संचालकपदावरून दूर करण्यासाठीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

दरम्यान पाचही कंपन्यांच्या संचालक मंडळ सदस्याचा मिस्त्री यांनी याच महिन्यांत सोमवारी तर टाटा सन्सच्या ‘बॉम्बे हाऊस’ मुख्यालयात उशिरा झालेल्या बैठकीनंतर राजीनामा दिला. बैठकीस यावेळी समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व निष्कासित अध्यक्ष सायरस मिस्त्र हे दोघेही होते.

Leave a Comment