‘ईडी’ने केली केरळमधील राज्य सहकारी बँकांची तपासणी

ed
कन्नूर (केरळ) : कन्नूर, कोझिकोड, थिरसूर येथील राज्य सहकारी बँकांची अंमलबजावणी संचालनालयाने आज तपासणी केली. तर कोल्लम आणि मल्लापुरम जिल्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागानेही तपासणी केली.

८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत केरळमधील कन्नूर, कोझिकोड आणि थिरसूर येथील राज्य सहकारी बँकत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली होती. त्यामुळे संचालनालयाने ८ नोव्हेंबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत या बँकांमध्ये बनावट खाते तयार करून त्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का किंवा हवालामार्फत रक्कम जमा झाली आहे का दृष्टीने कागदपत्रांची सविस्तर तपासणी केली. अंमलबजावणी संचालनालयाला गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळूर, अहमदाबाद, चेन्नईसह देशभरातील अन्य काही शहरांमध्ये छापा टाकला.

विविध माध्यमातून नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर काळा पैसाधारक त्यांच्याकडील पैसे पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच प्राप्तिकर विभागाने अशा प्रकारांवर नजर ठेवत देशभरातील विविध छापे टाकून कारवाई केली. बुधवारी प्राप्तिकर विभागाने तमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. त्यापूर्वीही काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवर छापे टाकून तपास करण्यात आला होता.

Leave a Comment