
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबदी सुरु असताना ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याची घोषणा केली आहे. असे असले तरी ५० रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहतील. ५० रुपयांच्या नव्या नोटांचे डिझाईन हे महात्मा गांधी सीरिज-२००५च्या नोटांसारखेच असेल. पण यावरील नंबर नव्या पद्धतीने छापले जातील, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.
चलनात येणार ५० रुपयांच्या नव्या नोटा !
50 रुपयांच्या नव्या नोटवरील नंबर पॅनलवर इन्सेट लेटर R असेल. तसेच नंबर आकार चढत्या क्रमानुसार वाढत जाईल. म्हणजेच पहिला अंक लहान, त्यानंतरचे अंक मोठे होत जातील. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी या नव्या नोटांवर असेल. तसेच नव्या नोटांवर २०१६ हे प्रिटिंग वर्ष छापलेले असेल.
