सप्तरंगी साप, ड्रॅगनसदृश पालीसह सापडल्या १६३ नव्या प्रजाती

snake
ग्रेटर मेकाँग:’डब्ल्यूडब्ल्यूएफ’ या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संशोधकांनी सप्तरंगी साप, ड्रॅगनसदृश पाली यांच्यासह प्राण्यांच्या १६३ नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. मात्र या परिसरात अनेक प्रकारच्या सजीवांच्या जाती अस्तित्वात आहेत. मात्र मानवी वावरासह अनेक समस्यांमुळे त्या धोक्यात आल्या असल्याचा इशाराही या संशोधकांच्या गटाने दिला आहे.
snake1
ग्रेटर मेकाँग हा म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, चीन या देशांमध्ये पसरलेला भूभाग आहे. या परिसरात समृद्ध जैव वैविध्य असून त्यामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातींचा अधिवास आहे. या परिसरात ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या वतीने संशोधन करून नवीन प्रजाती शोधून काढण्यात आल्या आहेत. नवीन प्रजातींच्या शोधाबरोबरच या परिसरातील जैव वैविध्याच्या सद्यस्थितीचा अभ्यास आणि निरीक्षणेही संस्थेने आपल्या अहवालात नोंदविली आहेत.
या परिसरातील वाढत्या खाणी, तलाव आणि धरणांची कामे यामुळे परिसरातील अनेक प्रजाती धोक्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाढत्या शिकारींमुळेही अनेक प्राण्यांची संख्या गंभीर प्रमाणात घटत आहेत. गेंड्याचे शिंग, वाघाचे कातडे आणि हाडे यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात चढ्या असल्याने या प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषतः: चीनमध्ये वाघाच्या हाडांपासून औषध बनविले जाते. तसेच मंदिरांच्या बांधकामातही त्याचा वापर होतो. त्यामुळे ग्रेटर मेकाँग हा प्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा आंतराष्ट्रीय अड्डा बनला आहे.
snake2
मागील ५० वर्षापूर्वी जगात जेवढे प्राणी अस्तित्वात होते; सन २०२० पर्यंत त्यापैकी केवळ दोन तृतीयांश प्राणी शिल्लक राहतील; असा इशाराही ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या अहवालात देण्यात आला आहे.

Leave a Comment