बँकेत एकरकमी जमा करा जुन्या नोटा : अरुण जेटली

arun-jaitley
नवी दिल्ली: अवघे काही दिवसच जुन्या नोट्या भरण्यासाठी शिल्लक असताना रिझर्व्ह बँकेने आणखी एक नवा फतवा काढला असून जर तुमच्याकडे जुन्या नोटा असतील, तर त्या आता एकाचवेळी बँकेत भराव्या लागणार आहेत. तुम्ही जुन्या नोटा जर टप्प्या-टप्प्याने भरत असाल तर त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागेल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. कारण आता जवळपास जुन्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या आहेत. मात्र काही लोक जुन्या नोटा जमा करण्यासाठी दररोज बॅँकांमध्ये जात असल्यामुळे संशय निर्माण झाला असल्याचे जेटली म्हणाले. त्यामुळे जर तुमच्याकडे जुन्या नोटा शिल्लक असतील तर ३० डिसेंबरपर्यंत एकाचवेळी बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. रिझर्व बँकेनेही यासंबंधी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असून, ज्यांच्याकडे जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा आहेत. त्यांनी त्या बँकांमध्ये भरण्याची ३० तारखेपर्यंतची शेवटची संधी दिली आहे.

Leave a Comment