असावा सुंदर ४३५ कोटींचा बंगला

dlf
नवी दिल्ली – दिल्लीत एक बंगला डीएलएफ कंपनीचे अध्यक्ष के.पी. सिंग यांची मुलगी रेणुका तलवार यांनी खरेदी केला असून ४३५ कोटी एवढी या बंगल्याची किंमत असून, या बंगल्याचा व्यवहार म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातला या वर्षातला सर्वात महागडा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे. हा दिल्लीतील पृथ्वीराज मार्गावर बंगला असून त्याचे क्षेत्रफळ ४९२४ चौरस मीटर एवढे आहे. टीडीआय इन्फ्राकॉमचे व्यवस्थापकीय संचालक कमल तनेजा यांच्याकडून रेणुका तलवार यांनी हा बंगला खरेदी केला आहे. यासाठी रेणुका तलवार यांनी प्रति चौरस मीटरसाठी ८.८ लाख एवढी किंमत दिली आहे.

Leave a Comment