जिओच्या तोडीसतोड प्लान आणण्याच्या तयारीत बीएसएनएल

bsnl
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना मोठा धक्का दिल्यानंतर आता बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीही ग्राहकांसाठी नवे व्हॉईस कॉल प्लॅन आणण्याच्या तयारीत असून तसे संकेत बीएसएनलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका कार्यक्रमात दिले आहेत.

बीएसएनल यूझर्ससाठी अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल व्हॉईस कॉल प्लॅन बाजारात आणण्याचा विचार करत असून ही सुविधा बीएसएनएलवरुन इतर कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर कॉलसाठी असेल. त्याचबरोबर १४९ रुपये किंवा त्याहून कमी दरात डेटाही उपलब्ध करुन देण्याचीही योजना असल्याची माहिती बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.

सध्या सुधारणांचे वारे बीएसएनएलमध्ये वाहत असून बीएसएनएलची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. आता बीएसएनएलच्या कामाचा फायदाही मिळण्यास सुरुवात झाली आहे, असेही अनुपम श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले. २०१८-१९ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मिळवू, अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे येत्या काळात भारतातील टॉप-३ टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये बीएसएनएल असेल, असेही श्रीवास्तव म्हणाले.

Leave a Comment