या हॉटेलमध्ये सिंहाबरोबर घेता येतो नाश्ता

jamala
वन्य प्राण्यांबद्दल प्रेम आहे, उत्सुकता आहे व त्यांच्या राहण्यावागण्याबाबत माहितीही करून घ्यायची आहे तर मग ऑस्ट्रेलियातील कॅनबेराच्या जमाला वाईल्ड लाईफ हॉटेलला भेट द्यायलाच हवी. कॅनबराच्या नॅशनल झू अॅन्ड एक्वेरियम मध्ये हे रिसॉर्ट उभारले गेले आहे. पर्यटकांसाठी फाईव्ह स्टार सुविधा असलेली तीन लॉजेस येथे आहेत. जिराफ ट्री हाऊस, जंगल बंगलो आणि शाका लॉज अशी त्यांची नांवे असून ही कल्पना राबविण्यामागे येथील झू वाढावे, ब्रिडींग सपोर्टसाठी पैसा मिळावा व पर्यटकांना तसेच वन्य जीवांविषयी कुतुहल असलेल्यांना ती माहितीही मिळावी असा उद्देश आहे. या लॉज मध्ये राहण्यात थ्रिल अनुभवता येतेच पण रिलॅक्सही होता येते. संपूर्ण सूरक्षा ठेवून तुम्ही येथील वन्य प्राण्यांसोबत मौजमजा करण्याचा आनंदही लुटू शकता.

lion
तुम्ही नाश्ता करत असाल तर अचानक एखादा सिंह आपल्याला न्याहाळतो आहे व तेही अगदी जवळून हा अनुभव येथे घेता येतो. टबबाथ घेत असताना एखादे अस्वल अवतीभवती फिरतेय, जिराफ तुमच्या अगदी शेजारी आलाय असे रोमांचकारी प्रसंग तुम्ही अनुभवू शकता. येथे १८ खोल्या असून या सर्व खोल्यांमधून काचेचे मोठाले पॅनल लावले गेले आहेत व या पॅनलपलिकडे तुमचे हे जंगली मित्र आहेत.

bear
अक्वेरियममध्ये महाप्रचंड शार्कसोबतच अनेक प्रकारचे समुद्री जीव तुमच्या अवतीभवती पोहोत असल्याचे अनुभवता येते.

Leave a Comment