स्टायलिश इलेक्ट्रीक स्कार्फ

scarf
डिसेंबर म्हणजे थंडीचा महिना. थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर बरोबरच स्कार्फही उपयुक्त. पण अनेकांना स्कार्फ वापरणे आवडत नाही. अशा लोकांच्या सोयीसाठी थंडी व उन्हाळा अशा कुटल्याही सीझनमध्ये वापरता येतील असे स्टायलिश इलेक्ट्रीक स्कार्फ डोएल कंपनीने बाजारात आणले आहेत. हेडफोनसारखे दिसणारे हे स्कार्फ म्हणजे पर्सनल एसी हिटींग, कुलींग डिव्हाईस आहे.

मानेच्या आकारानुसार मिळणारे स्कार्फ एर्गोनॉमिक डिझाईननुसार बनविले गेले आहेत. ते कोणत्याही वातावरणात वापरता येतात. वजनाला हलके असलेले हे स्कार्फ थंडीत उब देतात तर उन्हाळ्यात गारवा देतात. त्याला ऑटो सेफ्टी शटऑफ सुविधा आहे त्यामुळे शॉक बसणे, जळणे असे धोके त्यात नाहीत. हे उपकरण बॅटरी पॅकवर चालते.

कंपनीने मुख्य अधिकारी सुदीप डे म्हणाले हे देशातले पहिलेच पेटंटेड कुलींग, हिटींग टू इन वन वेअरेबल डिव्हाईस आहे. त्याचा त्वचेशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही त्यामुळे जास्त वेळ ते वापरले तरी कोणतीही अडचण येत नाही. कॅपिंग, सायकलींग, खेळत असतानाही त्याचा वापर करता येतो.

Leave a Comment