पेट्रोल, डिझेलची नियोजित दरवाढ टळली

petrol
नवी दिल्ली : शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणार असलेली नियोजित दरवाढ तूर्तास टळली असून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.२६ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १.७८ रुपये दरवाढ सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून करण्यात येण्याची शक्यता होती. जनतेच्या मनात नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या संतापात दरवाढीचे तेल ओतले जाऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

दर महिन्याच्या १ ते १६ तारखेच्या दरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) या कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात. हे बदल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या भावाचा आढावा घेऊन केले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढ वाढले आहेत. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.२६ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलटर १.७८ रुपये दरवाढ होणे अपेक्षित होते. यात स्थानिक उपकर धरण्यात आलेले नाहीत.

Leave a Comment