ट्विटरने लाँच केले लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग फीचर

twitter
नवी दिल्ली : आपले बहुप्रतिक्षित लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर ट्विटरने भारतात लाँच केल्यामुळे युझर्सना कार्यक्रम, बर्थ डे सेलिब्रेशन किंवा इतर अनुभव ट्विटरवर लाईव्ह शेअर करता येणार असल्याची माहिती ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी दिली आहे. फेसबुकने यापूर्वी लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर लाँच केले होते. त्यानंतर ट्विटरने ट्विटर लाईव्हची घोषणा केल्यानंतर युझर्सना या फीचरची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती.

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये ट्विटरने नुकतीच जारी केलेली अपडेट असणे आवश्यक आहे. कंपोज मेसेज या पर्यायामध्ये गेल्यानंतर कॅमेरा ऑप्शनमध्येच लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय दिलेला आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कॅप्शन द्यावे लागेल. कॅप्शन दिल्यानंतर तुम्ही गो लाईव्ह या पर्यायावर क्लिक करुन लाईव्ह करु शकता.

Leave a Comment