अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक

jee
नवी दिल्ली : आधार कार्ड जेईई या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक करण्यात आले असून आहे. विद्यार्थ्यांना २०१७ पासून आधार कार्ड बंधनकारक असेल, असे लेखी उत्तर लोकसभेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात आले आहे.

जेईईनंतर देशातल्या इतर परीक्षांसाठीही आधार कार्ड आवश्यक करण्याचा सरकारचा विचार चालू आहे. परीक्षेला दुसरा कुणी विद्यार्थी बसू नये, बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने गैरप्रकार रोखता येतील, असे सरकारचे म्हणणे आहे.

दरम्यान आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आधीच फटकारलेले आहे. मात्र आम्ही बंधनकारक नाही, तर त्या योजनेचा सकारात्मक वापर करतो आहे, असा दावा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

Leave a Comment