केवळ १५ मिनिटात लेनोव्होच्या ३५ हजार स्मार्टफोनची विक्री

lenevo
नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर केवळ १५ मिनिटात लेनोव्होच्या ‘के ६ पॉवर’ या मॉडलचे ३५ हजार स्मार्टफोनची विक्री झाली असल्याची माहिती फ्लिपकार्टने दिली आहे. केवळ ७ दिवस हा फोन लाँच करुन झाले आहेत. या सात दिवसात तब्बल १७ लाख फोन्सची विक्री झाली आहे.

या फोनमध्ये ४०००mAh एवढ्या दमदार क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय ५ इंच आकाराची स्क्रीन, ४३० स्नपड्रॅगन ऑक्टाकोअर प्रोसेसर, ३जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. फिंगर प्रिंट सेन्सरसह ४जी VoLTE असे फीचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment