चार दिवसात जिल्हा बँकांमध्ये पैशांचा पाऊस

note2
मुंबई – नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये १० ते १४ नोव्हेंबर या अवघ्या चार दिवसात ५ हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली असून ही सर्व रक्कम चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरुपातील आहे. त्यावेळी जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती.

शेतक-यांची जिल्हा बँकांमध्ये बहुतांश खातीही असतात. जिल्हा बँकांची नाबार्ड ही प्रमुख बँक असून नाबार्डने संशयास्पद व्यवहार शोधण्यासाठी काही खात्यांचा तपास सुरु केला आहे. काही खात्यांचा बेहिशोबी रक्कम जमा करण्यासाठी वापर करण्यात आला अशी तक्रार आल्याचे अधिका-यांनी सांगितले. राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांवर स्थानिक राजकरण्यांचे वर्चस्व आहे.

Leave a Comment