‘एअरसेल’ची अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि डेटा ऑफर!

aircel
मुंबई : देशातील अन्य टेलिकॉम कंपन्यांना रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी जोरदार पद्धतीने बाजारात उतरावे लागले आहे. ‘एअरसेल’ने या पार्श्वभूमीवरच आपल्या ग्राहकांसाठी दोन जबरदस्त ऑफर लॉन्च केल्या आहेत. ग्राहकांना या ऑफर्समध्ये अनलिमिटेड डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल.

एअरसेल कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना RC २४९ ऑफरमध्ये अनलिमिटेड फ्री कॉल्स तसेच अनलिमिटेड टूजी टेडा मिळू शकेल. त्याचबरोबर फोर जी ग्राहकांना १.५ जीबी अतिरिक्त फोर जी डेटाही मिळू शकेल. हा प्लान २८ दिवसांसाठी वैध राहील. तर RC १४ ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा एका दिवसासाठी मिळू शकेल. याशिवाय, याआधी कंपनीने केलेल्या FRC १४८ ऑफरनुसार, ग्राहकांना १४८ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर ९० दिवसांसाठी फ्री एअरसेल टू एअरसेल कॉल मिळतील.

Leave a Comment