याहूची १०० कोटी इमेल अकाउंट हॅक

yahoo
न्यूयॉर्क – याहू या कंपनीने जगातील सर्वात मोठ्या वैयक्तिक इमेल अकाउंट हॅकिंगच्या घटनेत तब्बल १ अब्ज इमेल अकाउंट हॅक झाल्याची कबुली दिली असून याहू कंपनीचे इमेल अकाउंट हॅक २०१३ साली करण्यात आले होते.

याहूने आमच्या साइटवर सायबर हल्ला झाला असून काही इमेल अकाउंट हॅक झाले आहेत असे म्हटले होते. परंतु, याहू कंपनीने नुकताच हा आकडा दिला आहे. याहूने ही माहिती अमेरिकेच्या सेक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनसमोर ठेवली आहे.

यामुळे याहू कंपनीच्या इमेल अकाउंटमध्ये असलेली सर्व माहिती धोक्यात आली असून आपण इमेल अकाउंट उघडण्यासाठी आपले नाव, आडनाव, सेक्युरिटी प्रश्न, जन्मदिवस इत्यादी माहिती देतो, ही सर्व माहिती हॅक करण्यात आली आहे. तसेच, इमेल अकाउंट युजरनेम पासवर्ड आणि इमेलमधील गोपनीय माहितीदेखील हॅक झाली आहे.

कंपनीने सप्टेंबर २०१६ मध्ये पहिल्यांदा याबाबतचा खुलासा केला होता. या आधी तुम्ही या गोष्टीचा का खुलासा केला नाही विचारले असता कंपनीने म्हटले की आम्ही या गोष्टीचे विश्लेषण करत होतो त्यामुळे ही माहिती उघड करायला उशीर झाला. जर तुमचे अकाउंट हॅक झाले असेल तर त्याबाबत याहू तुम्हाला इमेल करून कळवेल असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत याहूने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment