अॅक्सिस बँकेच्या २० बनावट खात्यातून ६० कोटी रुपये जप्त

axis-bank
नोएडा : नोएडा सेक्टर ५१ येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेवर आयकर विभागाने छापा टाकला. यामध्ये २० बनावट कंपन्यांच्या खात्यांतून ६० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम ही बनावट खात्यांमध्ये होती. ही खाती शेतकरी, कामगारांच्या नावांवर उघडण्यात आली असल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.

एका सराफाने नोटाबंदीनंतर ६०० कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री केली होती. या सराफाचे खाते देखील याच बँकेत असल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले होते. दरम्यान आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर बँकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पत्रकार आणि फोटोग्राफर्ससोबत गैरवर्तन केले. मात्र बँक व्यवस्थापकाने याबद्दल माफीही मागितली.

Leave a Comment