सरकारची लकी ग्राहक योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती

cashless
नवी दिल्ली : सरकारने देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली असून ‘लकी ग्राहक योजना’ असे या योजनेचे नाव असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. १५ हजार लोकांना रोज १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे.

तसेच १४ एप्रिल २०१७ ला ३ मेगा ड्रॉ असणार आहेत. त्यात तीन वेगवेगळ्या विजेत्यांना १ कोटी, ५० लाख आणि २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी या योजनेची घोषणा केली.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) पुढील १०० दिवसांसाठी १५ हजार ग्राहकांना १००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याची सुरूवात क्रिसमसपासून म्हणजे २५ डिसेंबर पासून होणार आहे.

या शिवाय व्यापाऱ्यांसाठी डिजी धन व्यापारी योजनाची घोषणा केली आहे. या माध्यमातून डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी दर आठवड्याला ७ हजार व्यापाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या प्रत्येक व्यापाऱ्याला जास्ती जास्त ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल.

Leave a Comment