जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता ?

bank1
नागपूर : राज्यातील जिल्हा बँकावरील निर्बंध हटवून, पैसे भरणे आणि काढण्याला परवानगी मिळण्याचे संकेत मिळत असून उद्या संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यातील ३१ जिल्हा बँकांची गेले दोन दिवस नाबार्डने तपासणी केली. त्यातील ठेवी, जमा झालेले पैसे, झालेले व्यवहार याबाबत नाबार्डने तपासणी करुन, आपला अहवाल अर्थ मंत्रालयाला सादर केला आहे. जिल्हा बँकेला पैसे द्यावे आणि खात्यात पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी परवानगी द्यावी, या दोन मागण्या राज्य सरकारने केल्या होत्या. राज्य सरकारच्या या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment