आता विमान प्रवास करा हफ्त्यावर

jet-airways
नवी दिल्ली : देशात नोटबंदीनंतर रोख रक्कम व्यवहारात कमी येत असल्यामुळे रोख रक्कम देशभरात कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे विमान सेवा देणाऱ्या कंपन्या देखील प्रभावित आहेत. विमान कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेज ईएमआय वर लोकांना विमान सेवा देत आहेत. विमान सेवेसाठी जेट एअरवेजने तिकीट बुक करण्याचे आवाहन केले आहे, त्यासाठी कंपनीने अॅक्सिस, एचएसबीसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक यांच्यासह अनेक बँकांसोबत करार केला आहे.

याबाबत माहिती देताना कंपनीचे चीफ कमर्शियल ऑफिसर जयराज शनमुगम यांनी म्हटले की, सध्या डिजिटल आणि फायनॅशल क्रांतीच्या दिशेने भारत पुढे जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी, बुकिंगसाठी लोक क्रेडिट कार्ड आणि इएमआयचा पर्याय देखील निवडत आहेत. आम्हाला आशा आहे की, ग्राहक या योजनेचा पूर्ण उत्साहाने लाभ घेतील. वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर तिकीट बुकिंगसाठी ही ऑफर दिली जात आहे.

अॅक्सिस बँक, एचएसबीसी, आयसीआयसीआय, इंडसइंड, कोटक महिंद्रा आणइ स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे क्रेडिट कार्ड वापरुन ग्राहक तिकीट बुकिंग करताना इएमआयचा पर्याय निवडू शकतात. क्रेडिट कार्ड होल्डर तिकीट बुकिंग दरम्यान ३, ६, ९, १२ महिन्यांचा पर्याय निवडू शकतात.

Leave a Comment