नवीन वर्षापासून महागणार ‘टाटा’च्या प्रवासी कार

tata
नवी दिल्ली – टाटा मोटर्सने प्रवासी कारच्या किमती कच्च्या माल महाग झाल्याने वाढविण्याचा निर्णय घेतला असून या प्रकारातील कारच्या किमती पुढील महिन्यापासून २५ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. कंपनीच्या मॉडेलनुसार या किमती किमान पाच हजार ते कमाल २५ हजारापर्यंत वाढविण्यात येतील. १ जानेवारीपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यात स्टील, ऍल्यूमिनियम, तांबे, रबर यासारख्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या असल्याने कंपनीला गाडय़ांच्या किमतीत वाढ करण्याव्यतिरिक्त पर्याय नाही, असे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसायाचे प्रमुख मायांक पारीक यांनी सांगितले. यापूर्वी रॅनो आणि टोयोटा या कंपन्यांनीही कारच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. हा नवीन दर पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे.

Leave a Comment