स्टार्टअप कंपन्यांना फेसबुकचे आर्थिक सहाय्य

fbstart
मे २०१६ मध्ये जगातील सर्वाधिक फेसबुक युजर असलेला देश ठरल्यानंतर भारतातील मोबाईल अॅप मदतीने चालविल्या जाणार्‍या स्टार्टअपसाठी फेसबुकने आर्थिक मदतीचा हात पुढे केला असून आत्तापर्यंत अशा अनेक कंपन्यांत फेसबुकने ५० लाख रूपयांपर्यंतची आर्थिक मदत केली असल्याचे समजते.

दोन वर्षापूवी फेसबुकने जगभरातील स्टार्टअपना फंडींग करण्यासाठी एफबी स्टार्ट प्रॉग्रॅम राबविला आहे. ज्या देशातील कंपन्यांना असे फंडिग केले जाणार आहे, त्यात भारताचा समावेश आहे. आत्तापर्यंत फेसबुकने भारतातील अनेक स्टार्टअपना १३५ कोटी रूपयांचा सपोर्ट दिला आहे. त्यात फॅशन ई कॉमर्स काऊटलूक, पार्टिको, प्रेग्नन्सी बेबीकेअर अॅप हिलओफाय यांना ४० हजार डॉलर्स तसेच काही फ्री टूल्स व सर्व्हीसेसची मदत दिली आहे. विडीओवाईब व माय चाईल्ड या स्टार्टअपनाही फेसबुकने मदतीचा हात दिला आहे.

Leave a Comment