‘जनधन’मध्ये जमा झालेल्या पैशांची होणार एफडी?

jan-dhan-yojna
नवी दिल्ली : जनधन खात्यामध्ये नोटबंदीनंतर जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत असून मोदी सरकार हे पाऊल काळा पैसावाल्यांना अद्दल घडवण्यासाठी उचलू शकते असे बोलले जात आहे.

पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी घेतला. या निर्णयानंतर जनधन खात्यामध्ये तब्बल २१ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. काळा पैसा धारकांनी त्यांचाकडचे पैसे जनधन खात्याच्या माध्यमातून पांढरे केल्याचा केंद्र सरकारला संशय असल्यामुळे मोदी सरकार हे पाऊल उचलू शकते. हे एफडी किती कालावधीचे असणार याबद्दल मात्र अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

Leave a Comment