एका रात्रीत केस कापणारा बनला शंभर कोटींचा मालक

note3
नवी दिल्ली : अनेकांच्या खात्यामध्ये नोटबंदीनंतर पैशांचा पाऊस होत असून पुन्हा अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये समोर आली आहे. जेथे केस कापणारा दिलशाद हा शंभर कोटींचा मालक बनला आहे.

दिलशादच्या बँक खात्यात ९९.९९ कोटी जमा झाल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. त्यानंतर दिलशाद सगळ्यांना सांगू लागला की, मोदी सरकारने त्यांचे आश्वासन पाळले आहे. त्याच्या खात्यात सरकारने पैसे जमा केले आहे. हा मॅसेज स्टेट बँकेकडून आला होता. ज्यामध्ये लिहिले होते की, ९९ कोटी. ९९ लाख ९९९ रुपये तुमच्या खात्यात क्रेडिट झाले आहेत. सकाळ होताच दिलशानने एटीएममध्ये जाऊन बँलेस चेक केला तर त्यामध्ये देखील एवढीच रक्कम दाखवली गेली.

Leave a Comment