५५० आइनस्टाइन अवतरले दिल्लीत

delhi
नवी दिल्ली – एक नवा जागतिक विक्रम दिल्लीत सुरू असणाऱ्या भारतीय विज्ञान महोत्सवात रचला जाणार असून शनिवारी या महोत्सवासाठी उपस्थित असणारे ५५० शालेय विद्यार्थी विख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइनच्या वेशभुषेत अवतरले आहेत. आइनस्टाइनची ओळख असलेले हिरव्या रंगाचे स्वेटर्स, टाय, डोक्यावर पांढऱ्या केसांचा भलामोठा टोप आणि पांढरी मिशी असा वेष या सर्व विद्यार्थ्यांनी धारण केला आहे. यापूर्वी कॅलिफोर्नियातील शाळेने अल्बर्ट आइनस्टाइनसारखी वेशभुषा करून एकाच जागी जमण्याचा विक्रम केला होता. या शाळेचे ३०४ विद्यार्थी २०१५ मध्ये आइनस्टाइनसारखी वेशभुषा करून एकत्र जमले होते. मात्र, आता हा जागतिक विक्रम दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या नावे होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. आपल्या शास्त्रज्ञांना मोठे पुरस्कार जिंकण्यासाठी स्वत:मधील किलर इंस्टिक्ट वाढवावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांमधील विज्ञानाप्रतीची आवड वाढविली पाहिजे. पुढील २० ते ४० वर्षात हे सातत्याने घडेल तेव्हा आपल्याला सी.व्ही. रमन यांच्यासारखा आणखी एखादा शास्त्रज्ञ मिळू शकतो, असे मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.

Leave a Comment