५०० च्या जुन्या नोटा आजपासून चलनातून पूर्णपणे बंद

note
मुंबई – ५०० च्या जुन्या नोटा आजपासून चलनातून पूर्णपणे बंद होणार असून ५०० च्या जुन्या नोटा शुक्रवारपासून चलनातून बाद झाल्या आहेत. याआधी केंद्र सरकारने ५०० रुपयांच्या जुन्या नोटांच्या वापराची अवधी १५ डिसेंबर निर्धारित केली आहे. ती अवधी कमी करून १० डिसेंबर केली व त्यानंतर ती ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत करण्यात आली.

शुक्रवारी आपल्या निर्णयावर केंद्र सरकारने पुन्हा यूटर्न घेत रेल्वे, मेट्रो आणि बस तिकीटांसाठी ५०० रुपयांच्या जुन्या नोटांच्या वापराची मर्यादा आणखी एक दिवसाने कमी करत ही अवधी ७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच करण्यात आली.

५०० च्या जुन्या नोटा चलनातून ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रेल्वे तिकीट काउंटर, सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बस आणि ट्रेनमधील कॅटरिंग सेवांमधून बंद होणार आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा व मेट्रो रेल सेवेसाठी तिकीट खरेदीसाठी ५०० च्या जुन्या नोटा चालणार नाहीत. सरकारने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, रेल्वे, बस व मेट्रो या सेवांसाठी ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ५०० च्या जुन्या नोटा चालणार नाहीत.

Leave a Comment