फ्री सेवा देण्याच्या शर्यतीत वोडाफोनही सामील!

vodafone
मुंबई: एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोनही रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी फ्री सेवा देण्याच्या शर्यतीत सामील झाळे आहे. देशभरात अनलिमिटेड फ्री कॉलिंग प्लान वोडाफोनने लाँच केला आहे.

१४४ रुपयांच्या पॅकपासून प्रीपेड यूजर्ससाठी सुरवात असणार आहे. या पॅकमध्ये देशभरात वोडाफोन टू वोडाफोन फ्री अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. तसेच ५०० एमबी डेटाही मिळेल. या पॅकची व्हॅलिडेटी २८ दिवसांपर्यंत असणार आहे. तर ३४४ रुपयांच्या पॅकवर वोडाफोनच्या सर्व मोबाइल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल फ्री असणार आहे. तसेच नॅशनल रोमिंग फ्री असणार आहे. तसेच यूजर्सला १ जीबी ४जी डेटा मिळेल.

याबाबत माहिती देताना वोडाफोनचे चीफ कमर्शियल ऑफिसर संदीप कटारिया यांनी सांगितले की, नुकतेच देशभरात नॅशनल रोमिंगवर आम्ही फ्री इनकमिंग कॉल केले आहे. आता या अनलिमिटेड कॉलिंग प्लानसोबत आता आम्ही २० कोटी प्रीपेड यूजर्सना बराच फायदा मिळू शकेल. १५० रुपयात आणि ३५० रुपयात एअरटेल आणि आयडियाने देखील फ्री प्लान लाँच केले आहेत. जे फक्त प्रीपेड यूजर्ससाठी आहेत.

Leave a Comment