
मुंबई : रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता रिलायन्स जिओ वापरण्यासाठी तुमच्याकडे केवळ ४जी असलेल्या स्मार्टफोनची गरज नसणार कारण आता तुम्ही २जी, ३जी फोनमध्येही ‘रिलायन्स जिओ’ कार्डचा वापर करू शकाल.
आता २जी आणि ३जी फोनमध्येही वापरता येणार ‘जिओ’
आपले २जी, ३जी फोन सपोर्टिव्ह डिव्हाईस कंपनीने बाजारात उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. जियोफाय ४जी पोर्टेबल व्हाईस आणि डेटा डिव्हाईस हे हॉटस्पॉटच्या रुपात काम करते. यामुळे फोन कॉलसोबतच व्हिडिओ कॉल आणि जिओच्या सगळ्याच अॅप्सचा वापर केला जाऊ शखतो. म्हणजेच, ग्राहकांकडे ४जी सपोर्टिव्ह स्मार्टफोन नसेल तरी ते रिलायन्स जिओचा वापर करू शकतील. ग्राहकांना यासाठी जियोफाय सिम घेऊन २जी, ३जी सपोर्टिव्ह फोन बीजे जिओ४जीव्हाईस अॅप्लीकेशन डाऊनलोड करून जिओ नेटवर्कशी कनेक्ट करावे लागेल. आत्तापर्यंत पाच करोडहून अधिक रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या झाली आहे. कंपनीने ३१ मार्च २०१७ पर्यंत आपल्या सर्व सेवा मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
