रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

rbi
मुंबई : सर्वांना धक्का देत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवले असून आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेपो दर ६.२५ टक्के कायम असेल. आज रिझर्व्ह बँकेचे द्विमासिक पतधोरण जाहीर झाले. दरम्यान, विकास दर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे ७.६ टक्क्यांवरुन ७.१ टक्क्यांपर्यंत घसरण्याची चिन्ह आहेत. एवढेच नाही तर कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च ) महागाई दर धोक्याच्या पातळीवर आहे. दुसरीकडे नोटाबंदीमुळे चलन तुटवड्याच्या शक्यतेचा परिणाम विकासदरावरही होण्याचे संकेत आहेत.

Leave a Comment