टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात जमा झाले तब्बल ९ हजार ८०० कोटी

dirver
पटियाला – सर्व सामान्यनागरिकांमध्ये नोट बंदीच्या निर्णयानंतर अनेक गोंधळ झालेले पाहायला मिळाले. आता तर एका टॅक्सी ड्रायव्हरच्या बँक खात्यात चक्क थोडे थोडके नाही तर तब्बल ९ हजार ८०० कोटी रुपये जमा झाले आहेत. टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या हरपाल सिंह यांच्या खात्यात पंजाबमधील बर्नाळाच्या स्टेट बँक ऑफ पटियालाच्या ब्रांचने चुकून ही गलेलठ्ठ रक्कम जमा केली आहे.

मात्र घोडचुकीची जाणीव होताच तात्काळ दुसऱ्या दिवशी ही रक्कम पुन्हा काढून घेण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना स्टेट बँक ऑफ पटियालाच्या अधिकाऱ्यांची दमछाक झाली आहे. हे प्रकरण आयकर विभागाने गांभीर्याने घेतले असून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे नजरचुकीने रक्कम जमा झालेले हरपाल सिंह यांचे हे जनधन खाते होते. त्यामुळे हरपाल सिंह यांना १ दिवसाच्या रक्कमेवरचे व्याज मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण या रक्कमेचे एका दिवसाचे व्याज तब्बल ४ कोटी एवढे आहे. या सगळ्या प्रसंगामुळे हरपाल सिंह सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. मात्र बँकेच्या या भयंकर चुकीमुळे ग्राहकांचा बँकेबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे.

Leave a Comment