रेनोने अवघ्या १४ महिन्यांत विकल्या १ लाखांहून अधिक क्विड

kwid
नवी दिल्ली : अवघ्या १४ महिन्यांमध्ये १ लाखांच्या घरात एसयूवी सारखे डिझाईन, अत्यंत अधुनिक फिचर्स आणि वैशिष्टपूर्ण किंमत अशी गुणवैशिष्ट्ये लाभलेल्या रेनो क्विडची विक्री गेली आहे. रेनो क्विडने नुकताच एक लाखाचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर २०१५मध्ये ही कार लॉन्च झाली होती. अवघ्या १४ महिन्यांत इतका मोठा टप्पा गाठणे हे कंपनी आणि कारच्या दृष्टीने मोठे यश मानले जात आहे.

अगदी सुरूवातीची रेनो क्विडची किंमत पाहिली तर ती अवघी २.६४ लाख रूपये इतकी होती. त्यानंतर वाढून ती ४.२५ लाख रूपयांपर्यंत गेली. दिल्लीतील एका शोरूममधील ४.४५ लाख ही किंमत आहे. ही कार बाजारात आली तेव्हा तिची टक्कर ह्युंडाईची इयॉन, मारूती सुजूकीची ऑल्टो आणि डॅटसनची रेडी-गो सोबत होती. या स्पर्धेत क्विड यशस्वी ठरली असून, तिने आपल्या विक्रीचा उच्चांकही नोंदवला आहे.

दरम्यान, ही कार दिसायला एकदम एसयूवी कार सारखी दिसते. या कारमध्ये स्मोक्ड हॅडलॅप्स आणि मॅट-ब्लॅक क्लैंडिग दिले आहे. अत्यंत अत्याधुनीर फिचर्स आणि टचक्रिन म्युजिक सिस्टम तसेच, डिजीटल इस्ट्रूमेंट क्लस्टर अशी या कारची वैशिष्ट्ये आहेत. कारची केबिन अत्यंत स्वच्छ आणि आरामदायी असून, या कारमध्ये ३०० लिटरचा बूट स्पेस मिळतो. सुरूवातीला रेनो क्विडला ०.८ लीटर इतके पेट्रोल इंजिन क्षमतेने बाजारात आणले होते. हे इंजिन ५४ पीएसची पॉवर आणि ७२ एनएमचा टॉर्क देत होता. दरम्यान, याच वर्षी ऑगस्ट महिन्यात ही कार अधिक पॉवरवाल्या १.० लीटर इंजनसोबत सादर करण्यात आली. छोटी ऑटोमॅटीक कारची मागणी वाढत असल्याने कंपनीने या कारला ऑटोमॅटीक लूकमध्येही बाजारात आणले आहे. ग्राहकांनीही या कारचे चांगले स्वागत केल्याचा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment