नोटबंदीवरून विरोधकांना या मुलीने दिले कडक उत्तर

note
नवी दिल्ली – देशातील जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागू केलेल्या ५००, १०००च्या नोटांवरील बंदीचे जोरदार समर्थन आणि कौतुक होत आहे. भले नागरिकांना त्रास होत असला तरी देशहितासाठी मोदींनी घेतलेल्या निर्णयाला ते साथ देत आहेत. तर दुसरीकडे विरोधक मोदींच्या या निर्णयाला चुकीचा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न होत आहे.

यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होता आहे, ज्यात तुलिका बिश्नोई नामक एक मुलगी नोटबंदीवर आपले मत मांडत आहे. या व्हिडीओत ही मुलगी नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे काळापैसा बाळगणारे आणि विरोधकांची झोप उडवली हे सांगत आहे. मोदींच्या चलनबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे पैशांसाठी मारामार सुरु आहे. आज आम्ही आपल्याला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, तो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील देशाच्या वाढीस आम्ही देखील सोबत आहोत असे म्हणाल.

मोदींच्या चलन बंदीच्या निर्णयामुळे विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या विरोधकांना सर्वसामान्य जनतेने उत्तर दिले आहे. हा व्हिडीओ कोणी बनवला आहे याबाबतची माहिती नाही. पण हा व्हिडीओ दिल्लीतील एका रिक्षा चालकाने बनवला असल्याची चर्चा आहे. या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षाच्या मागे भाऊ असावा भरतासारखा आणि पंतप्रधान असावा मोदी सारखा…! असे स्लोगन लिहिले आहे.

Leave a Comment