बारीकशी अट पाळा गेस्ट हाउसमध्ये मोफत रहा

mesan
सुटीवर जायचे म्हणजे प्रथम स्वस्त हॉटेल्स कोणती याचा शोध प्रामुख्याने घेणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. महाबळेश्वरच्या अलिकडे असलेल्या निसर्गरम्य पांचगणीमध्ये तुम्ही आलिशान गेस्ट हाऊसचा उपयोग अगदी मोफत घेऊ शकता. त्यासाठी एक बारीकशी अट आहे व ती म्हणजे येथे राहताना दिवसातले तीन तास तुम्हाला मालकाच्या ऑर्गेनिक शेतीवर काम करावे लागते.

ला मेसन नावाच्या या गेस्टहाऊसचे मालक आहे एक इराणी जोडपे. मुंबईहून ते येथे आले व त्यांनी चार खोल्यांचे आलिशान गेस्ट हाऊस बांधले. येथे राहताना कांहीतरी वेगळे पण उपयुक्त करावे असे त्यांच्या मनात आले व त्यातूनच ही मोफत निवासाची कल्पना त्यांना सुचली. वूफिंग या नावाने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. येथे राहू इच्छीणार्‍यांना राहण्यासाठी पैसे द्यायचे नाहीत पण शेतात तीन तास काम मात्र करायचे. अशा स्कीम खाली काम करणार्‍यांना वूफर्स असे म्हणले जाते. या गेस्टहाऊसमध्ये मुक्काम टाकायचा असेल तर वेबसाईटवर जाऊन बुकींग करता येते व बाकी माहितीही घेता येते.

Leave a Comment