विमानांना आकाशस्थ धोकयांची सूचना देणारा उपग्रह लाँच

noaa
अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी व हवामान प्रशासन विभागाने (एनओएए) नुकताच एक उपग्रह अंतराळात पाठविला आहे. हा उपग्रह आत्तापर्यंतच्या हवामान उपग्रहातील सर्वात उत्तम उपग्रह असल्याचा दावा केला जात आहे. हा उपग्रह ढगांच्या अत्यंत स्वच्छ प्रतिमा पाठविणार आहेच पण हवामानातील बदल, वार्‍यांचा वेग, धुके, बर्फ, ढगांतील विजांची प्रखरता यांचीही माहिती देणार आहे.

याचा सर्वाधिक फायदा वैमानिकांना होणार आहे. ही माहिती उपग्रहाकडून मिळताच संबंधित धोक्यांच्या आसपास असणारी विमाने त्यांचे मार्ग बदलून अधिक सुरक्षित मार्गाने जाऊ शकणार आहेत व त्यामुळे विमानांवर वीज पडणे, वादळात विमान भरकटणे असे प्रकार कमी होऊ शकणार आहेत. २०१७ पासून हा उपग्रह आकडेवारी पाठविणार असल्याचेही समजते.या उपग्रहासाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले गेले असून पूर्वीच्या उपग्रहांच्या तुलनेत तो पाच पट वेगाने माहिती पाठवू शकणार आहे. तसेच त्याने पाठविलेल्या प्रतिमाही अधिक स्पष्ट असतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment