
काळ्या पैशाविरोधात तसेच बनावट चलनाला आळा घालण्यासाठी भारताने ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा परिणाम शेजारी पाकिस्तानवरही झाला आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या खासदाराने ५ हजार व १ हजारांचा नोटा चलनातून रद्द कराव्यात अशी मागणी केली आहेच पण १ डिसेंबरपासून पाकिस्तानातील १०.२०,५० व १०० रूपयांच्या जुन्या डिझाईनच्या नोटाही चलनातून बाद होत असून नागरिकांना नोटा बदलण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली गेली आहे.
पाकिस्तानातही नोट बंदी- जुन्या नोटा चलनातून बाद
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने २०१५ मध्येच जुन्या डिझाईनच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या नोटा २००५ मध्ये चलनात आल्या आहेत व बाजारात त्या पूर्णपणे सर्क्युलेट झाल्यानंतर त्या बंद करण्याचा निर्णय अमलात आणला जात आहे. यामागेही काळ्या पैशांवर नियंत्रण आणणे हाच हेतू असल्याचे सांगितले जात आहे.
