ऑस्ट्रेलिया प्लॅस्टीक नोटा वापरणारा पहिला देश

austre
कागदी नोटांचा वापर बंद करून त्या जागी प्लॅस्टीकच्या नोटा पूर्णपणे चलनात आणणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश आहे. १९९६ मध्येच त्यांनी कागदी नोटा बंद करून प्लॅस्टीक नोटा चलनात आणल्या आहेत. त्यामागेही बनावट नोटा चलनात येऊ नयेत व काळा पैसा नियंत्रणात राहावा हाच मुख्य उद्देश होता. आता ब्रिटननेही प्लॅस्टीक नोटा चलनात आणल्या आहेत. प्लॅस्टीक नोटा चलनात आणल्यामुळे काळ्या पैशांवर तसेच भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यात खूपच यश आल्याचे ऑस्ट्रेलियातील अर्थतज्ञांचे मत आहे.

अर्थात कागदी नोटा रद्द करताना ऑस्ट्रेलिया सरकारने सिस्टीमॅटिक पद्धतीने जुन्या कागदी नोटा लिगल टेंडरच्या सहाय्याने चलनाबाहेर काढल्या. पॉलिमर नोटांमुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविता आले कारण या नोटांची नक्कल करणे अतिशय अवघड आहे. परिणामी बनावट नोटाही बाजारात आणणे कठीण जाते असे समजते.

uro
स्वित्झर्लंडकडून भ्रष्टाचार व काळा पैसा नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातात. तेथे १०,२०,५०,१०० व १ हजारांच्या नोटा चलनात आहेत व त्या सिरीजमध्ये छापल्या जातात. आत्तापर्यंत अशा आठ सिरीज छापल्या गेल्या आहेत मात्र त्यातील सातवी सिरीज सरकारने जारीच केलेली नाही. नकली नोटांचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसले तर ही रिझर्व्ह ठेवलेली सातवी सिरीज चलनात आणली जाणार आहे.

Leave a Comment