३२ लाख एटीएम कार्ड करप्ट

atm
मुंबई- सुरक्षेच्या कारणास्तव एसबीआयचे तब्बल ६ लाख डेबिट कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यात भरीस भर म्हणून आता एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एस बँक, अॅक्सिस बँक यांचे तब्बल ३२ लाख एटीएम कार्ड करप्ट झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कार्ड ब्लॉक आणि करप्ट ऐन सणासुदीच्या काळात झाल्याने ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

एसबीआयच्या कार्डसाठी इतर बँकांच्या एटीएमचा वापर केल्याने करप्ट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल सहा लाख कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय एसबीआयने घेतला. इतर बँकांनीही काही ठराविक कार्ड ब्लॉक केले असून ते रिप्लेस करण्याचा सुचना ग्राहकांना दिल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये बँकांनी केवळ एटीएम पीन बदलण्याचा सुचना ग्राहकांना दिल्या आहेत.

काही ग्राहकांनी चीनमधील काही ठिकाणांहून कार्डचा वापर झाल्याची तक्रार केली आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेस सिस्टिममध्ये व्हायरस शिरल्याने संभावित धोका गृहित धरुन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी बँकांकडून फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येत आहे.

Leave a Comment