काही दिवसातच पुन्हा रुळावर येणार माथेरानची फुलराणी !

matheran
माथेरान: एअरब्रेक सिस्टिमसह पुन्हा माथेरानची फुलराणी अर्थात ‘टॉय ट्रेन’ सुरु होणार असल्यामुळे आता पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेन प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. सुरक्षेच्या कारणावरुन यावर्षी मे महिन्यात टॉय ट्रेन बंद करण्यात आली होती.

सेंट्रल रेल्वेने नेमलेल्या सुरक्षा समितीने ६ कोच आणि ३ इंजिन असलेली टॉय ट्रेन म्यॅनुअल बेक्रच्या साहाय्याने चालवणे धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर आता एअर ब्रेक सिस्टीमसह ट्रेनची सुरक्षा चाचणी घेतल्यानंतर टॉय ट्रेन पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. दरम्यान, यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच ट्रेन दोनदा रुळावरुन घसरली होती. त्यामुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती. याचा माथेरानच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ही फुलराणी पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे.

Leave a Comment