बाजारात येत आहे सुपर फोन

super-fon
मुंबई : ‘ट्युरिंग रोबोटिक इंडस्ट्रीज’ ही कंपनी एक नवा सुपरफोन बाजारात आणणार असून या फोनमध्ये तब्बल १२ जीबी रॅम असणार आहेत. त्याचबरोबर या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडेच राहतील.

हा स्मार्टफोन तुम्हाला १२ जीबी रॅम, ६० मेगापिक्सल कॅमेरा आणि तीन बॅटरीसहीत मिळणार असून स्मार्टफोनचे नाव ‘कॅडेन्झा’ असे या असले तरी ‘फ्युचर फोन’च्या नावानही हा फोन ओळखला जात आहे. हा फोन आयफेल टॉवर एवढ्या उंचीवरून खाली फेकला गेला तरी तो तुटणार नाही असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन ‘लिक्विडमोर्फियम’ नावाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. हा धातू अॅल्युमिनिअम आणि स्टीलपेक्षा जास्त मजबूत असतो. तसेच हा फोन वॉटरप्रूफही असेल.

तब्बल ५१२ जीबी इंटरनल मेमरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर २५६ जीबीचे दोन मायक्रो एसडी कार्ड टाकून ही मेमरी ५१२ जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते. ‘फ्युचर फोन’ची इतर वैशिष्ट्य म्हणजे, १६ क्रायो कोरचे दोन स्नॅपड्रॅगन ८३० प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम यात असेल. २ जीबीच्या वेगवेगळ्या सहा स्लॉटमध्ये हा रॅम उपलब्ध असेल.

1 thought on “बाजारात येत आहे सुपर फोन”

Leave a Comment