
मुंबई – दिवाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग साइट्स या भरपूर सूट देत आहेत. स्मार्टफोनवर या मोसमात चांगला डिस्काउंट मिळत आहे.
ऑनलाईन शॉपिंग साइट्स स्मार्टफोन्सवर देत आहेत ‘हेवी’ डिस्काउंट
आसूस झेन फोन २ – आसूस या फोनची किंमत फ्लिपकार्ट या साइटवर १८,९९९ रुपयांनी कमी करुन ९,९९९ रु. ठेवण्यात आली आहे. या फोनचे फीचर्स उत्तम आहेत.
मोटो टर्बो – अमेजॉनवर उपलब्ध असलेल्या ६४ जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोटो टर्बोची किंमत ३१,९९९ रुपये आहे. या फोनची किंमत १३,९९९ रुपये करण्यात आली आहे.
अॅपल आयफोन ६- १६ जीबी इंटरनल मेमरी असलेल्या फोनवर ७,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच एक्सचेंज ऑफर देखील आहे.
सॅमसंग गॅलक्सी ऑन ८- सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर १,००० रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
मोटोरोला मोटो एक्स स्टाइल- हा फोनवर ३०,००० रुपये किमतीवर लाँच झाला होता. फेस्टीव्ह सीजनमध्ये याची किंमत २१,००० रुपये करण्यात आली आहे.
एलजी जी ५- ५३,००० रुपये किमतीवर लाँच झाला होता. ३९,००० रुपयांना हा फोन अॅमेजॉनवर उपलब्ध आहे. १४,००० रुपयांचा घसघशीत डिस्काउंट या फोनवर मिळत आहे.
शिओमी मी ५- २४,९९९ रुपये किंमत असलेला हा फोन १९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
