
नवी दिल्लीः एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्सचा वर्षाव सुरु केला आहे. आतापर्यंत ज्या एअरटेल ग्राहकांनी ४जी सेवेचा लाभ घेतलेला नाही. त्यांना एका मिस कॉलवर १जीबी डेटा मोफत मिळणार आहे. हा डेटा २८ दिवस ते ९० दिवसांपर्यंत वापरता येणार आहे.
एअरटेलची नवी कोरी ऑफर; मिस कॉल द्या आणि १ जीबी डेटा मिळवा,
ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला ५२१२२ या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. आतापर्यंत ज्या ग्राहकांनी एअरटेल ४जी सेवेचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठीच ही ऑफर आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, कोलकाता, कर्नाटक, केरळ, हरियाणा या राज्यांमध्ये सध्या ही ऑफर लाँच केली आहे. एअरटेल ४जी प्रीपेड ग्राहकांसाठी ही ऑफर आहे.
