ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्यांदा झाली पेट्रोल -डिझेलच्या किमतीत वाढ

petrol
मुंबई: ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून, नवे दर आज (शनिवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोलच्या किमतीत प्रितलिटर १.३४ रूपये तर, डिझेल प्रतिलिटर २.३७ रूपयांना वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील नियंत्रण सरकारणे मुक्त केल्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील किमतीचा आढावा घेऊन या दरात वाढ किंवा घट होते.

दरम्यान, ऑक्टोबर महिना वाहनधारकांसाठी म्हणावा तितका फलदायी ठरला नाही. तेल कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात या अगोदर दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. एक ऑक्टोबर आणि चार ऑक्टोबर अशी दोनवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे.

डिलर्सच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी एकदा दर वाढवण्यात आले. डिझेल दरवाढीचा परिणाम महागाईच्या दरावर होत असतो. त्यामुळे डिझेल महागल्याचा काही प्रमाणात महागाईवर परिणाम होणार आहेत. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरवाडीमुळे सरकारबद्धल जनतेच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.

Leave a Comment