मारुती ऑल्टो बदलणार आपला लुक

maruti-alto
मुंबई: रेनोची क्वीड कार नवी डिझाईन, फीचर्स आणि कमी किंमत यामुळे मागील वर्षातील सर्वात हिट कार ठरली आहे. क्वीडबाबत मिळणाऱ्या चांगल्या प्रतिक्रिया यामुळे मारुती अल्टोला मात्र चांगला झटका बसल्यामुळे अल्टो आता नव्या लूकमध्ये येणार असून जी क्वीडला टक्कर देणार आहे.

छोट्या कारच्या सेगमेंटमध्ये क्वीड बाजारात आल्यानंतर अल्टोच्या भागीदारीत घट झाली आहे. तर क्वीडने वर्षभरात २० टक्के हिस्सा आपल्या नावावर केला आहे. अल्टोने आपल्या या नव्या प्रोजेक्टला Y1K नाव दिल्याचे वूत्त आहे. ही आजवरची सर्वात आकर्षक अल्टो असल्याचा दावा करण्यात येत असल्याचेही समजते आहे की, क्रॉसओव्हर डिझाइनमध्ये नवी अल्टो येण्याची शक्यता आहे. क्विडला मिळालेल्या यशामध्ये त्याच्या डिझाइनचा देखील महत्वाचा रोल आहे. नवीन अल्टो तीन वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी पुढील चार वर्षात नवे १५ मॉडेल लाँच करणार आहे. तसेच सध्या वॅगनार आणि सेलेरिओ या कारवर देखील काम सुरु आहे.

Leave a Comment