१७ ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडिया फेस्टीव्हल

amazon
मुंबई: सध्या सणवाराला सुरुवात झाल्यामुळे सगळीकडेच उत्सवाचे वातावरण असून ऑनलाईन शॉपिंग विश्वातही याचा धमाका सुरू आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर या महिन्याच्या सुरूवातीलाच झालेल्या धमाकेदार सेलनंतर पुन्हा एकदा सेलचा धमाका होणार आहे. हा सेल दिवाळी स्पेशल असून यातही ग्राहकांना अनेक वस्तूंवर घसघशीत सूट मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा ग्राहक कमी किंमतीत पुन्हा त्यांच्या पसंतीच्या वस्तूंची खरेदी करू शकणार आहे.

पुन्हा एकदा ऑनलाईन शॉपिंगसाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या अ‍ॅमेझॉनवर सेल सुरू होणार असून हा सेल १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान राहणार आहे. या सेलमध्ये अनेक ऑफर देण्यात येणार असून अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. यावेळीही वेगवेगळ्या कॅटेगरीतील वस्तूंवर मोठी सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शॉपिंग करण्यासाठी तुम्ही तयार रहा.

१७ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणा-या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ५५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तर फॅशन कॅटेगरीतील खरेदीवर तब्बल ४० ते ८० टक्के सूट मिळणार आहे. यासोबतच होम आणि किचन कॅटेगरीतील कोणत्याही खरेदीवर तुम्हाला तब्बल ७० टक्के सूट दिली जाणार आहे. यासोबतच टॉईज, हाऊसहोल्ड, पर्सनल केअर या कॅटेगरीतील वस्तूंवर ६० टक्के सूट दिली जाणार आहे. तर मिडिया कॅटेगरीतील बुक्स आणि मनोरंजनाच्या वस्तूंवर ६० टक्के सूट दिली जाणार आहे.

दिवाळी सण काही दिवसांवरच येऊन ठेपला असून दिवाळीला नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. ऑनलाईन शॉपिंगलाही तितकच महत्व मिळालं आहे. अ‍ॅमेझॉनवर असलेल्या सेलमध्ये अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार असल्याने ग्राहकांची मोठी बचतही होणार आहे. त्यामुळे १७ ते २० या तारखा लक्षात ठेवा आणि खरेदी यादी तयार ठेवा.

Leave a Comment