पश्चिम बंगालमधील गावात आकाशातून कोसळला निळा बर्फाचा तुकडा

ice
कोलकाता- पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील सासन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले पाकदा या गावात निळा रंगाचा बर्फ पडला असून आकाशातून पाच ते सहा किलो वजनाचा बर्फ या गावातील सोफीकूल इसलाम याच्या घराच्या अंगणासमोर पडला. बर्फाचा तुकाडा हा निळा रंगाचा असून परिसरात याची मोठी चर्चा होत आहे.

जमिनीवर पाच ते सहा किलोचा बर्फ पडल्याने एक फुटाचा खड्डा पडला आहे. निळा रंगाचा बर्फ पडल्याची माहिती गावातील लोकांना मिळताच लोकांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लोकांनी यांची माहिती परिसरातील पोलीस ठाण्याला कळवली. पोलिसांनी बर्फाचा तुकडा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.

Leave a Comment