हायपरटेंशन कमी करण्यासाठी दहा उपाय

hypertension
हायपरटेंशन म्हणजेच हाय ब्लडप्रेशर नॉर्मल करण्यासाठी दहा उपाय सांगितले गेले आहेत. पहिला उपाय म्हणजे जॉगिंग. ज्यामुळे आपले हृदय मजबूत होते आणि रक्तदाब सामान्य होतो. दुसरा उपाय म्हणजे कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ सेवन करणे. शिवाय पोटॅशियमची मात्रा भरपूर असणारे केळी अधिक खाणे आणि मीठ कमी खाणे. मीठ कमी खाण्याचे रक्तदाबात एवढे महत्त्व आहे की प्रत्येकाने दररोज चार ग्रॅम मीठ कमी खाल्ले तर हजारो जीव वाचतील.

बाजारातील तयार अन्नपदार्थ शक्यतो टाळावेत. अशा खाद्यपदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. बिस्किटस्, न्याहरीचे पौष्टिक असल्याचा दावा करणारे पदार्थ आणि तयार जेवण यामध्ये आपल्या शरीरात जाणार्‍या मिठापैकी ८० टक्के मीठ असते. तेव्हा तयार खाद्यपदार्थ वर्ज्य. वजन कमी करणे हा एक रक्तदाब घटवण्याचा उपाय आहे. कारण शरीराचे वजन वाढले की हृदयावरील ताण वाढतो. वजन कमी करण्याबरोबरच निकोटीनेच प्रमाण कमी करणे जे धूम्रपानातून मिळत असते. निकोटीनने हृदयाची गती वाढते आणि ब्लड प्रेशर वाढू शकते.

झोपेत घोरण्याची सवय असणार्‍यांना रक्तदाबाचा विकार जडण्याची जास्त शक्यता असते. जे लोक मोठ्या आवाजात घोरतात त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना लवकरच रक्तदाब जडतो. दिवसातून तीन वेळा किंवा त्यापेक्षा अधिकवेळा कॉफी पिणे हेसुध्दा रक्तदाबाला कारणीभूत ठरते. फळांचा रस प्यावा ही गोष्ट चांगलीच आहे मात्र दिवसातून जास्तीत जास्त पाव लीटर एवढाच ज्यूस प्यावा त्यापेक्षा अधिक ज्यूस पिल्याने रक्तदाबा वाढण्याची शक्यता ७ टक्के जास्त असते. बिटरूट, पालक आणि कोबी यांचे सेवन जास्त प्रमाणात करणे यामुळेही रक्तदाब कमी होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment