सॅमसंग ‘गॅलक्सी नोट ७’ची अदलाबदली सुरु

galaxy
सियोल : दक्षिण कोरियामध्ये गॅलक्सी नोट ७ च्या ग्राहकांसाठी जुन्या हँडसेटऐवजी नव्या हँडसेटची डिलिव्हरी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने सुरु केली आहे. गॅलक्सी नोट ७ स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर कंपनीने सर्व हँडसेट परत मागवले होते.

याबाबत कंपनीच्या माहितीनुसार, हा एक्सचेंज कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे आणि जोपर्यंत सर्वांचे स्मार्टफोन बदलून दिले जात नाहीत, तोपर्यंत सुरुच राहील. सॅमसंग गॅलक्सी नोट ७च्या ग्राहकांनी आपला जुना स्मार्टफोन परत करुन, त्याऐवजी नवीन मॉडेल मिळणार आहे किंवा ग्राहकांना नव्या स्मार्टफोनऐवजी पैसेही परत दिले जणार आहेत. १९ ऑगस्टला सॅमसंग गॅलक्सी नोट ७ स्मार्टफोन लॉन्च झाला होता आणि जगभरात २५ लाखाहून अधिक हँडसेट्सची विक्री झाली होती. यामध्ये दक्षिण कोरियात ४ लाख आणि अमेरिकेत १ लाख हँडसेट्सची विक्री झाली आहे.

Leave a Comment