याच महिन्यात लेनोव्हो झेड २ प्लसचे लॉन्चिंग

lenovo
मुंबई : लेनोव्हो या प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनीच्या बहुप्रतीक्षित ‘लेनोव्हो झेड२ प्लस’ स्मार्टफोनची भारतातील लॉन्चिंगच्या इव्हेंटचे मीडिया इन्व्हिटेशन पाठवले असून लेनोव्होने पाठवलेल्या इन्व्हिटेशनमध्ये ‘WITNESS TOMARROW… TODAY’ असे लिहिले आहे . येत्या २२ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता लॉन्चिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या आठवड्यात लेनोव्होने एक व्हिडीओ टीझर लॉन्च करत या स्मार्टफोनमध्ये काही अॅप आधीपासूनच इन्स्टॉल असतील, अशी माहिती दिली होती.

लेनोव्हो झेड२ प्लसमध्ये १९२०×१०८० पिक्सेल रिझोल्यूशनवाला ५ इंचाचा पूर्ण एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. १५ गीगाहर्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ग्राफिक्ससाठी एड्रेना ५३० जीपीयू इंटिग्रेटेड, ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज, १३ मेगापिक्सेलचा रिअर आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर कॅमेऱ्यामध्ये फेस डिटेक्शन, पॅनोरमा मोज, इंटेलिजेंट HDR, स्लो मोशन, व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर फिंगरप्रिंट सेन्सर, ४जी एलटीई, वाय-फाय ११ ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ १, यूएसबी टाइप-सी पोर्ट अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनची भारतातील किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या गुरुवारीच या स्मार्टफोनचे सर्व फीचर्स आणि किंमत कळू शकणार आहे.

Leave a Comment