मोटोरोलाचा मोटो ई ३ पॉवर भारतीय बाजारपेठेत दाखल

motorola
नवी दिल्ली – मोटो ई३ पॉवर हा नवीन स्मार्टफोन मोटोरोला या मोबाईल उत्पादक कंपनीने भारतीय बाजारपेठेत सादर केला. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर हा फोन उपलब्ध असून याची किंमत ७९९९ रुपये आहे. या फोनवर रिलायन्स जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ घेता येईल. मोटो ई ३ च्या तुलनेत या नवीन फोनमध्ये जास्त क्षमतेची म्हणजे ३५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या मोटो ई ३ या स्मार्टफोनची ही पुढील आवृत्ती आहे. यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

या फोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, १ गिगाहर्ट्ज क्वॉडकोअर मीडियाटेकचा प्रोसेसर, ऍन्ड्रॉइड ६.०.१ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा तर सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सलचा असून यात १६ जीबीचे इंटरनल स्टोरेज, २ जीबी रॅम देण्यात आली आहे.

Leave a Comment