जे सिरीजचे दोन स्मार्टफोन्स सॅमसंगने केले लाँच

samsung
नवी दिल्ली- जे सिरीजचे दोन स्मार्टफोन्स दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने लाँच केले असून सॅमसंगने गॅलक्सी जे फाइव्ह आणि गॅलक्सी जे सेव्हन प्राइम लाँच केले आहे.

सॅमसंगच्या बॅटऱ्यांचा गेल्या काही दिवसांमध्ये स्फोट होऊ लागला होता. त्यामुळे सॅमसंग विषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नव्या फोनध्ये कुठलाही धोका नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. गॅलक्सी फाइव्हची किंमत १४,७९० रुपये आहे तर गॅलक्रसी प्राइमची किंमत १८,७९० रुपये आहे. प्राइमची स्क्रीन ५.५ इंची आहे, गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी आणि २५६ एक्सपांडेबल मेमरी अशी या फोनची वैशिष्ट्ये आहेत. या फोनला ३,३०० एमएएच बॅटरी आहे. १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा आहे. गॅलक्सी जे फाइव्हला ५ इंची स्क्रीन आहे, क्वॉड कोअर प्रोसेसर २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी, २,४०० एमएएच बॅटरी, १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

Leave a Comment